Contact for Advertisement 9919916171


महाराष्ट्र: तानसेन बिवाल यांची भीम आर्मीच्या राज्य उपाध्यक्षपदी की हुई नियुक्ती

- Photo by : social media

महाराष्ट्र  Published by: Sukhadev Madhav Bival , Date: 03/06/2026 03:41:54 pm Share:
  • महाराष्ट्र
  • Published by: Sukhadev Madhav Bival ,
  • Date:
  • 03/06/2026 03:41:54 pm
Share:

संक्षेप

महाराष्ट्र: भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष व खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या निर्देशानुसार तानसेन बिवाल यांची भीम आर्मीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे।

विस्तार

महाराष्ट्र: भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष व खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या निर्देशानुसार तानसेन बिवाल यांची भीम आर्मीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। पुणे येथे आयोजित भीम आर्मी महाराष्ट्र कमिटीच्या संयुक्त बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला। या नियुक्तीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरातील भीम आर्मी कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। या बैठकीला भीम आर्मी महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे, राज्य मुख्य सचिव दीपक भालेराव, कमिटीचे प्रमुख पदाधिकारी सुनील थोरात, सुनील गायकवाड, संदीप शेलार, गुड्डू सोलंकी, लाल्ला सय्यद यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत तानसेन बिवाल यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले।

तानसेन बिवाल यांनी यापूर्वी भीम आर्मीचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना संघटनात्मक पातळीवर उल्लेखनीय कार्य केले आहे। जिल्ह्यातील विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांनी सक्रिय भूमिका घेतली असून अन्याय, अत्याचार आणि भेदभावाच्या घटनांविरोधात अनेक आंदोलने उभारली आहेत। पीडित आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला आहे। त्यामुळे समाजात त्यांची एक संघर्षशील आणि जनतेशी जोडलेली कार्यकर्ता अशी ओळख निर्माण झाली आहे। सामाजिक कार्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या कुटुंबातून मिळाल्याचे सांगितले जाते। त्यांचे चुलते दिवंगत बंटीभाई बिवाल यांनी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्य करताना समाजासाठी मोठे योगदान दिले होते। समाजहितासाठी केलेल्या त्यांच्या कार्याचा वारसा तानसेन बिवाल पुढे नेत असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांचे मत आहे।

भीम आर्मीच्या संघटनात्मक विस्तारासाठी तसेच दलित, वंचित आणि मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी तानसेन बिवाल यांची राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले। त्यांच्या नेतृत्वाचा लाभ राज्यभरातील कार्यकर्त्यांना मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला। दरम्यान, त्यांच्या नियुक्तीचे वृत्त समोर येताच अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील विविध सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। अनेक कार्यकर्त्यांनी ही नियुक्ती समाजासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे।